दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा
हडको :- नवीन नांदेड हडको येथील ज्याजल्य हनुमान मंदिराच्या आवारातील वडाचे झाड तोडून मंदिराच्या पाठीमागील रस्ता बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांना व वृध्द नागरिक लहान मुलांना रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. प्रशासन व महावितरण यांनी हे तोडलेले झाड रस्ताच्या बाजूला करून रस्ता पुर्ववत चालू करून द्यावा अशी मागणी मंदिर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
