दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
तालुक्यातील बोथी,कलकोटी भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी त्या भागातील शेतकऱ्यांने सहायक निबंधकाकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सदरील निवेदनात शेतकऱ्यांनी आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चालू खातेदार असून सर्व शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी पासून ऊस कर्जाची मागणी केलेली होती,त्यापैकी ३ शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले व बाकीच्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून कर्ज देण्यात आले नाही.
उर्वरीत शेतकऱ्यांना तात्काळ ऊस कर्ज द्यावे व आम्हाला ऊस कर्जापासून वंचित ठेवणा-या व संबधितावर निलंबन व गुन्हा दाखल करावा अन्यथा पुढील आठ दिवसानंतर आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन निषेध केला जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
या निवेदनावर मन्मथ अक्कानवरु,
बजरंग डिगोळे,दत्तु केंद्रे,श्रीकांत अक्कानवरु,शिवराज आवाळे,पंकज डिगोळे,नवनाथ डिगोळे,विठ्ठल तिकटे,ज्ञानोबा केंद्रे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी व उपस्थित होते
