दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शिवसेना इंदापूर शहर प्रमुख व भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य इंदापूर तालुका मा.श्री.महादेव सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज इंदापूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. सर्व प्रथम इंदापुर नगरीतील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुढील नियोजित कार्यक्रम करण्यात आले. या मध्ये इंदापुर बस स्थानक येथे मोफत शिव भोजन थाळीचे 200 लोकांना भोजन देण्यात आले.सकाळी 11:30 वाजता उपजिल्हा रुग्णालय इंदापुर येथे रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटत करण्यात आले.
यानंतर इंदापुर येथील शिवसेना जन संपर्क कार्यालय इंदापूर या ठिकाणी मेजर महादेव सोमवंशी यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला या वेळी इंदापुर शहर व इंदापुर तालुक्यातील खुप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नंतर इंदापुर येथील श्रीराम बालक आश्रम या ठिकाणी ही आश्रमातील मुलांना खाऊ व फळे वाटत करण्यात आली आणि त्यांना पुढील काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात जी काय मदत लागेल ती इंदापुर तालुका शिवसेनेच्यावतीने पुरवण्यात येईल असे शिवसेना तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी सांगितले.
सायंकाळी 5 वाजता इंदापुर शहरांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना पुणे जिल्हा समन्वयक विशाल (दादा) बोंद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीनजी (दादा) शिंदे, अरूण पवार तालुका समन्वयक,संजय खंडागळे शहर समन्वयक, सचिन चौगुले शहर क्षेत्र प्रमुख,बंडू शेवाळे उप शहर प्रमुख, अशोक देवकर उप शहर प्रमुख, बालाजी पाटील उप शहर प्रमुख,अरूण पवार तालुका समन्वयक, अंकुश गलांडे विभाग प्रमुख, संतोष क्षिरसागर इंदापुर शाखा प्रमुख, आकाश सोमवंशी, आदर्श सोमवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
