दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आसलेला गारअकुले येथील बजरंग आखाडा आसल्यामुळे नामांकित पैहीलवानाची उपस्थिती राहणार आहे.
गारअकोले तालुका माढा येथील स्वामी महाराजांच्या पावन भूमीमध्ये पै.आण्णा गायकवाड यांचा बजरंग आखाडा येथे निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे .
कोरोना महामारी संकटानंतर पहिल्यांदाच होत आसलेल्या निकाली कुस्त्या, आसल्यामुळे कुस्ती शौकिन पैहीलवानामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पै आण्णा गायकवाड मित्र परिवार गारअकोले यांच्यावतीन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य आणि दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक 14 मे 20 22 रोजी संपन्न होणार.
संयोजक:- पै आण्णासाहेब गायकवाड व मित्र परिवार यांच्या वतीने कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे.
इनाम 100 रुपये पासून ते 20 हजार रुपये पर्यंतच्या निकाली कुस्त्या जोडण्यात येणार आहेत.
सकाळी 11 ते 1 या वेळेत 20 हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जातील. गारअकुले यथील आखाड्या मध्ये नामांकित कुस्ती पै संतोष दोरवड शाहुपुरी तालीम// विरुद्ध पै गणेश जगताप आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे यांची लढत होणार आहे. बजरंग आखाड्याचे वस्ताद पै.आण्णा गायकवाड या नावाची ओळख आसल्या मुळे महाराष्ट्रातून नामांकित कुस्ती शौकीन पैहीलवान (मल्ल) हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
