दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
खामगाव :दि.१३. शहरातील पोलीस पोलीस सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारणे शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली आहे.यामुळेही बर्निंग कार पालिकेच्या अग्निशामक बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली.कार मधील गॅस किट मधून ज्वलनशील गॅसची गळती होऊन अकस्मात आगीने भडका घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खामगाव मधील बारादरी भागातील पोलिसांच्या वसाहतीजवळ सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारला दुपारी अचानक आग लागली होती. धुराचे लोळ उठत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी गाडीने पेट घेतलेला त्यांना दिसून आला.नागरिकांनी त्वरित अग्निशामक विभागाशी संपर्क साधला व याची माहिती अग्निशामक दलाला दिली परंतु अग्निशामक दल उशिरा घटनास्थळी दाखल झाल्यामुळे तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. वा तोपर्यंत उभी असलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.सदर कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या नरसिंग चव्हाण यांची असल्याची माहिती मिळाली आहे. गाडीचे जवळपास चार लाखाचे नुकसान झाले. रावण टेकडीवरून अग्निशामक दलाला शहरात येण्यास नेहमी उशीर होतो. रस्त्यामध्ये काही ठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा लावलेले आहे. त्यामुळे वाहन घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. सदर आग कशामुळे लागली पुढील चौकशी चालू आहे ?.
