दैनिक चालु वार्ता निरा नरशिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार
राधिका रेसिडेन्शिअल क्लब इंदापूर येथे भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी बावडा येथील मुजमीर अमिन तांबोळी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षावरील निष्ठा पाहुन मुजमीर तांबोळी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी निरा भिमाचे संचालक उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, मयुर पाटील, संरपंच किरण पाटील आदीसह मुस्लिम समाजातील बांधवांनी निवडीबद्दल मुजमीर अमिर तांबोळी यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
निवडी प्रसंगी मुजमीर तांबोळी म्हणाले, आगामी काळात तालुक्यातील युवकांचे संघटन करून पक्ष मजबूत करण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे.
तसेच तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवण्याचे काम माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.
