दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापुरात पत्रकार सेवा संघाची बैठक व शीरखुर्मा कार्यक्रम संपन्न…..
गंगापूर शहरातील देवगिरी लॉन्स येथे पत्रकार सेवा संघाची बैठक शीरखुर्मा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हाभरातून विविध दैनिकाचे व चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष रामनाथ जऱ्हाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड यांच्या सत्काराने करण्यात आली यावेळी बोलताना रामनाथ जराड म्हणाले की पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून नाव नोंदणीसाठी मंत्रालयीन दरबारी प्रयत्न करण्यात येतील.यावेळी गंगापूरचे अद्यक्ष खालील पटेल व रज्जाक शेख यांच्यावतीने शीरखुर्मा व भोजनाचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान यावेळी पत्रकार सेवा संघांचे राज्य पदाधिकारी अर्जुन अरगडे,अविनाश कुलकर्णी, सचिन उपाध्यय विकास सर,जिल्हाध्यक्ष रवींद्र सुरडकर,जिल्हाउपाध्यक्ष गुलाब वाघ, मोहसीन शेख गंगापूर तालुका अध्यक्ष खलील पटेल,उपाध्यक्ष फिरोज मन्सूरी, रज्जाकभाई शेख यांच्यासह सर्वश्री अवेश कादरी,इमरान खान,सैफ सय्यद,असद शेख, सुनिल झिंजूर्डे पाटिल , अंगद लोणे,रामेश्वर श्रीखंडे,अमीन पटेल, आदिसह पत्रकारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
