दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
श्री गणेश चारिटेबल ट्रस्ट मांडवे .(तळ्यातील नवश्या गणपती मंदिर) तसेच व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र राज्य आणि द आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या गणेशोत्सवामध्ये आपल्या माळशिरस तालुक्याचे सर्वांचे लाडके व लोकप्रिय आमदार श्री.रामभाऊ सातपुते साहेब यांच्या हस्ते गणपतीची पूजा व आरती संपन्न झाली.
यावेळी मांडवे गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बबन साहेब गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्री तानाजी पालवे आर पी आय अध्यक्ष महादेव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्री अर्जुन दुधाळ ग्रामपंचायत सदस्य श्री सुरज साळुंखे पोलीस पाटील श्री नितीन सोनटक्के माजी सरपंच सौ धनश्री पालवे मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप मोरे उपाध्यक्ष श्री महेश होळ सचिव श्री गोपीनाथ कोळी तसेच मांडवे गावातील सर्व ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्त उपस्थित होते या वेळी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार श्री रामभाऊ सातपुते साहेब यांचा सत्कार मंडळातर्फे श्री निवृत्ती वामन मोरे यांनी केला.
