दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री.रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
यवतमाळ:- राज्यात सर्वात मोठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेली यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था र.न.109 या संचालक मंडळाने मागील काही दिवसापासून पतसंस्थेच्या उपविधीमध्ये दुरुस्ती केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संचालक पदाचे दरवाजे खुले केले. तसेच ठेविदार मतदार संघातून एक संचालकाची जागा राखीव केली. हा सर्व प्रकार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था खाजगीकरण करण्याचे खूप मोठे षडयंत्र होते.ही पतसंस्था भविष्यात शासकीय कर्मचाऱ्याचीच राहावी, यासाठी जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने येणाऱ्या आमसभेत मूळ घटनेमध्ये कुठेही छेडछाड न करता भविष्यात ती शासकीय कर्मचाऱ्यांची राहावी, यासाठी ठराव घेण्याची मागणी केली. सोबतच पतसंस्थेचे सभासद वाढविण्याच्या दृष्टीने सर्व कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्स वर सभासद करण्याची मागणी केली. ठेवीदाराचा मतदार संघ रद्द करण्यात यावा. कर्मचारी हिताचे ठराव करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गोविंद इंगोले अध्यक्ष, भारत भितकर सचिव, सुहास परेकर कार्याध्यक्ष ,राजेंद्र खडतडे उपाध्यक्ष, अतुल पेठकर वरिष्ठ उपाध्यक्ष, प्रदीप भगत ,सुनील वनकर ,अरविंद राठोड, इकबाल साखळे , जितेंद्र बागेश्वर , देवकुमार गोंडाणे, प्रमोद धवसे,राजपाल गुजर , यांच्यासह इतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने केलेली आहे.
