दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे..
मंठा. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकचे अर्ज माघारीचा कार्यक्रम संपताच गावातील चित्र स्पष्ट झाल्याने राजकारण चांगलंच तापलं काहीने जनाने खर्चपाणी काढण्याच्या हिशोबाने अर्ज दाखल केला काहीच जमलं तर काहीच पांगल. परिसरातील ढाबे, रेस्टोरंट हॉटेलला सुगीचे दिवस आले आहे. उमेदवारच्या प्रचारासाठी विजयासाठीचे नियोजन बैठाकामुळे खानावळी हाऊसफुल चालू आहे. रोज वल्ल्या पार्ट्या होत दारूचा हात धुण्यासाठी वापर होत आहे.त्यात चर्चा काय तेव मेम्बर काय सरपंच काय ते पॅनल समदं ओक्केच. चिन्ह वाटप झाल्यामुळे उमेदवारा ची प्रिंटिंगप्रेसमध्ये व फोटो स्टुडिओमध्ये गर्दी पाहवयास मिळाली प्रचार साहित्यची बॅनर, बिल्ला पॅम्प्लेट छपाई चालू असून डिजिटल प्रचाराकडे कल वाढला काही गावात महिला उमेदवारचे पतीराजाची धावपळ दिसून येत आहे प्रचारासाठी आठ दिसाचा कालावधी असल्यामुळे भेटीगाठीने गावातील राजकारण चांगलंच ढवळुन निघाले आहे.
