दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
महाराष्ट्रातील कापुस उत्पादक शेतक-यांना रुपये प्रति क्विंटल ला रुपये ५०००/- ची सब्सिडी देण्यात यावी हि मागणी घेऊन आर्णी- वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संघात समाविष्ट असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकरी बांधवांची दि.१८ मे २०२३ ला भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी जानकार व्यक्तीमत्व किशोर तिवारी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
या रॅलीच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळात आलेल्या अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाकडुन आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करण्यात येईल असेही श्री.तिवारी यांनी दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे.
प्रेस नोट मध्ये दिलेल्या माहितीनुसार यावर्षी रिकॉर्डतोड 1.02 करोड़ हेक्टेयर क्षेत्रा कापुसाची लागवड करण्यात आली होती कारण की, गेल्या वर्षी कापसाच्या किमती 14,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचल्या होत्या.नंतर किमतींमध्ये सतत घसरत होऊन भाव 7,500 रुपये प्रति क्विंटल स्थिर झाला. त्यामुळे अगोदरपासूनच कर्जात असलेल्या कापुस उत्पादक शेतक-यां च्या डोळ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहला नव्हता असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.याबाबत अधिक माहिती देताना श्री.तिवारी यांनी यावर्षी पावसाळा नसताना बेमौसमात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अवकाळी पावसामुळे ४० टक्के पिके पुर्णपणे खराब झाली आहेत.
शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी यावेळच्या हंगामात महाराष्ट्रात जवळजवळ 3,300 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दाव करतानाच पुढे
केंद्र व राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कापुस उत्पादक शेतकऱ्यांची एक भव्य सरकार विरोध रैली 18 मे २०२३ ला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती देत, जे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचे केंद्र राहलेले आहे त्याच ठिकाणी विकल्या न गेलेला कापुसाची होळी पेटवली जाणार अशी महत्वपूर्ण घोषणा सुध्दा शेतकरी नेते श्री.तिवारी यांनी पुढे केली आहे. दुसरे शेतकरी नेते विजय जावंधिया तिचे नेतृत्वात अशा स्वरूपाचे आंदोलन करण्या-या कापुस उत्पादक शेतक-यांची प्रमुख मागणी म्हणजे सरकारने ५हजार रुपये प्रतिक्विंटल सब्सिडी देवुन शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज त्वरीत जाहीर करावे अशी असल्याची माहितीही सरतेशेवटी पत्रकातून दिली आहे.
