दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :दि. २.भारत सरकार नोंदणीकृत संस्था राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची नांदुरा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.या बैठकीत तालुका सहकार्याध्यक्षपदी कुंदन मिरगे,सहप्रसिद्धीप्रमुख पदी गोपाल पारधी,यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या व संघ बळकटीसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील, तालुका उपाध्यक्ष शिवाजी चिमकर,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,तालुका सचिव महेंद्र वानखडे,तालुका संघटक श्रीकांत हिवाळे,तालुका सहसचिव भागवत दाभाडे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,दिनेश ब्राम्हने व इतर पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते
