दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे टायगर ग्रुपच्या अध्यक्षा कविता चव्हाण व सरपंच मीनाताई संजय पांडव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना सन्मानचीन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, यांच्या शुभहस्ते देण्यात आले.यावेळी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाद्यक्ष अशोक वरकड पाटील, गणेश साळुंके,प्रीती मेहेरे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण,मजनू पठाण, सुरेश गव्हाणे,योगेश निकम,गणेश केरे, अशोक कऱ्हाळे, भाऊसाहेब थोरात, सरपंच बिट्टूभाऊ मोरे, वाल्मिक जाधव, योगेश साळवे, आक्रम बेग,आदिसह पोलीस मित्रा संघटनेचे पदाधिकारी व आशा सेविका, टायगर ग्रुपचे सदस्य यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यावेळी आशासेवकांनाही गौरविण्यात आले. दरम्यान यावेळी कविता चव्हाण यांनी लासूरगाव येथील दाक्षयानी देवीचेही दर्शन घेतले व तेथील मंदिर परिसरात फुल,नारळ,आदिन्साह निर्मल्याची साफसफाई केली.
