दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा:दि.५.इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व अस्पृश्य दलित समाजाच्या एकूणच सामाजिक , शैक्षणिक प्रगतीसाठी लढणारे सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्ती करून सनातनवादी धर्माच्या विरोधाला न घाबरता मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजश्री शाहू महाराज यांचा जन्म २६जून १८७४ रोजी झाला. बहुजनांना शिक्षण ,जातीभेद निर्मूलन, नोकरीमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे समाज सुधारक लोकशाहीवादी आरक्षणाचे जनक समतावादी राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. राजश्री शाहू महाराज हे २० वर्षाचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. शाहू महाराजांनी अस्पृश्यता जातीय भेद अंतासाठी फार मोलाचे कार्य केले .शिक्षणा विना उद्धार नाही हे ओळखून शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा, सत्यशोधक शाळा ,बालविर शाळा, डोंबारी मुलांची शाळा, कला शाळा,सैनिक शाळा, इत्यादी शाळांची निर्मिती केली. परंतु त्याकाळी मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता पाळल्या जात होती म्हणून अन्य जातीसाठी ही महाराजांनी वस्तीग्रह उघडण्याची ठरविले आणि १९०१ मध्ये १) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाउस सुरू केले.२) दिगंबर जैन वसतिगृह काढले. ३) वीरशोव लियागत विद्यार्थी वस्तीगृह . (१९०६ ) ४ ) मध्ये मुस्लिम बोर्डिंग. ५) दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डींग.६) आर्य समाज बोर्डिंग ७) मराठा समाज बोर्डिंग ८) वंजारी समाज वस्तीगृह ९) संत चोखामेळा विद्यार्थी वस्तीगृह नागपुर .१०) छत्रपती शाहू बोर्डिंग नाशिक इत्यादी ठिकाणी शाहू महाराजांनी शिक्षण संस्था वस्तीगृह निर्माण केली. संपूर्ण शिक्षण संस्था वसतिगृहामध्ये दलितांना शिक्षणात सवलती (आरक्षण )दिले. अनेकांना आपल्या राज्यकारभारात नेमले त्यांना मोटार गाडी चालवण्याची शिक्षण दिले ,अंगरक्षक नेमले , सैनिक म्हणून नेमणूक केली. तलाठी ,पोलीस ,शिपाई इत्यादी क्षेत्रातही त्यांना नेमले त्यांना सन्मानाची वागणूक दिली. शाहूमहाराज शिक्षणात हुशार होते. आणि शिक्षणाबरोबर त्यांना मैदानी खेळ भालाफेक, शिकार ,मल्ल खंब, कुस्तीचा छंद होता. ते मल्लविद्येचे चाहते होते. त्यांनी मल्ल विद्याला चैतन्य प्राप्त प्राप्त करून दिले. शाहू महाराजांनी १८९५ मध्ये मोतीबाग नामक सुंदर तालिमखाना निर्माण केला .आजही कोल्हापूर हेच कुस्त्यांचे श्रेष्ठ केंद्र म्हणून महाराष्ट्रभर ओळखली जाते. शाहू महाराज तुमचा आमचा सर्वांचा लाडका राजा होता .लोकांच्या अडचणी सोडवायचा दुःखितांचे अश्रू पुसायचा मोठ्या मनाचा दिलदार कृतीचा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा राजा होता. महाराजांनी अनेक लोककल्याणाची कामे केली. शेती व्यवसायाला विशेष महत्त्व दिले आणि अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे निर्माण केले , धरणे बांधली , तलाव निर्माण केले , त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी मिळू लागले शेतकरी उसाचे उत्पादन वाढू लागला शाहू महाराजांनी कोल्हापूर ला गुळाची बाजारपेठ निर्माण करून शहापुरी पेठ ही गुळाची लक्षावधी रुपयांची वार्षिक उलाढाल करणारी महाराष्ट्रातील नामवंत पेठ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. छत्रपती शाहू महाराजांचे स्वातंत्र्यलढ्यातही मोठे योगदान आहे . महाराजांनी कोल्हापूर बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहे. शाहू महाराजांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणात अनेक वेळा अर्थसहाय्य केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांचा सन्मान , सत्कार केला. त्यांच्याविषयी महाराजांनी गौरवोदगार काढले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर छत्रपती शाहू महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “मूकनायक “हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले हे राजश्री शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना भरघोस आर्थिक मदत केली. शाहू महाराजांनी वेळोवेळी दिलेला मदतीचा हात बाबासाहेबांनी सार्थकी लावून पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनवून शाहू महाराजांचे उदगार बाबासाहेबांनी सार्थक केले. ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निर्वाण झाले. शाहू महाराज शरीराने गेले पण त्यांच्या महान कार्याने व विचाराने अमर झाले. आज त्यांच्या शंभर व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला व विचाराला कोटी कोटी विनम्र अभिवादन …
