दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतीनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.९.उन्हाळ्याच्या सुरुवातीला लिंबाचा दर वाढू लागतो आणि एप्रिल मे महिना आला की कमी होतो. त्यामुळे मे महिन्यात लिंबाचा दर कमी होईल असे वाटत असताना अद्यापही दर मात्र तोच आहे. लिंबू या महिन्यात दहा रुपये प्रति नग मिळत आहे. लिंबाची आवक अद्यापही कमी असल्याने दर कमी झालेला नाही. जून पर्यंत हाच दर राहील अशी शक्यता लिंबू विक्रेत्यांनी वर्तविली आहे. हिरवी मिरची मात्र स्वस्त झाली आहे.
यांना तापमान ४४ अंशाच्या आसपास गेल्याने लिंबाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मांगणी जास्त परंतु पुरवठा कमी, अशी सध्या बाजारात परिस्थिती आहे. लिंबाच्या मागणीत वाढ झाली की दरात वाढ होते. परंतु एप्रिल महिना सुरू झाला की लिंबाचा दर कमी व्हायला सुरुवात होते. त्यांना अवकाळी पावसाचा फटका लिंबाच्या उत्पादनाला बसला आणि दराने उच्चांक गाठला. लिंबू दहा रुपयांवर जाऊन पोहोचले. त्यामुळे सोन्याचा दर लिंबाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लिंबाचा दर मे महिन्यात कमी होईल ही आशाही फोल ठरली आहे. लिंबू अद्याप दहा रुपये प्रति नग बाजारात मिळत आहे. पहिल्यांदाच लिंबा चा दर सलग दोन ते तीन महिने वाढलेला आहे. दरवर्षी दर कमी होत जातो. होलसेल बाजारात लिंबाचा दर कधीही पाच रुपयांच्या वर गेला नव्हता. परंतु आता होलसेल मध्ये लिंबू ८ रू. पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.
