दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर -गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावाजवळील मार्तंड नदीवरचा पूल मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूल वाहुन गेला आसता ग्रामस्था नी स्वखर्चाने लोकवर्गणी गोळा करून या पुलाची डागडुजी केली होती परंतु शासन स्तरावर एक वर्ष उलटूनही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही या विरोधात मा. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण व रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. एका वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळेजिल्हा मार्ग क्र 104 लिंबेजळगाव ते काटेपिंपळगाव या रस्त्यावर मार्तंडी नदीवरील जुना पूल वाहून गेला. हा रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना विध्यार्थ्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे व हा रस्ता बंद असल्यामुळे सर्व गावकरी वजनापूर फाटा येथे साखळी उपोषण करत असून उपोषणाची जर दखल न घेतल्यास दि 14 / 05/ 2022 रोजी उपोषण स्थळी सर्व ग्रामस्थाच्या वतीने सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येनार आहे.
