दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार दि.१०मे रोजी विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले.तहसिलदार राम बोरगावकर लोहा यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात येऊन राज ठाकरे यांनी चालविलेल्या मस्जीदीवरील भोंगा विरोधी आंदोलनांचा कृतिसील विरोध करण्यात आला दलित समाजाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत पाच हेक्टर जमीन वाटप करा.राज्यातील मागासवर्गीयांना गावरान जमीनीचे पट्टे नावे करून सातबारा वाटप करावे, सुशिक्षित बेरोजगारांना विना अट दहा लाख रुपये पर्यंत बॅंक मार्फत कर्ज पुरवठा करा,लस टोचत एल.जी.जोंधळे या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करा.
बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा,लोहा तालुक्यातील अवैध धंदे मटका, गुटखा, दारू,रेती अशी अनेक मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राम बोरगांवकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात आले या निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष बालाजी धनसडे, तालुकाध्यक्ष सुरेश महाबळे,तालुका उपाध्यक्ष दशरथ धनसरे,व तालुका लोहा कार्याध्यक्ष विश्वनाथ कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
