दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : भारतीय जनता पार्टी, पुणे शहराचे वतीने देशातील परिवर्तनाचे लोह पुरूष, गृहमंत्री श्री अमित शाह यांच्या कर्तबगारी वर आधारीत “अमित शाह आणि भाजपाची वाटचाल ” (संघर्षाची पाने जेव्हा … प्रवाही असतात) या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा पुण्यात होणार आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक शिवानंद द्विवेदी असून त्याचे मराठी अनुवादन डाॅ . ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर यांनी केले आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन ना. स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री (महिला व बालकल्याण मंत्रालय) यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांतदादा पाटील तर विशेष उपस्थिती खा. प्रकाश जावडेकर आणि खा. गिरिश बापट यांची तसेच ह्या पुस्तकाचे लेखक यांचीही असणार आहे. हा प्रकाशन समारंभ सोमवार दि. १६ मे, २०२२ रोजी संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे होणार असून सर्वांनी या कार्यक्रमास यावे असे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविले आहे.
