शिवा संघटनेमुळे शासकीय स्तरावर महात्मा बसवेश्वर जयंती साजरी होत आहे — प्रा. मनोहर धोंडे सर
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- माधव गोटमवाड
लोहा शहरात दि.११मे रोजी शिवा संघटनेच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
लोहा शहर हे बॅनर व कमानीने सजले आहे.
शिवा संघटनेच्या वतीने दरवर्षी लोहा शहरात शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटना लोहा शाखेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून भव्य मिरवणूक काढून जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते परंतु मागील दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या अटी व नियमामुळे लोहा शहरासहीत राज्यात कुठेच जयंतीची मिरवणूक निघाली नाही परंतु आता कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात दि.१ एप्रिल २०२२ पासून कोरोनाचे अटी व शर्ती शिथील केले असून राज्यात महामानवाच्या जयंत्या विविध कार्यक्रम होत आहेत.
यात शिवा संघटनेच्या वतीने नांदेड येथे दि. ३ हे २०२२ रोजी शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली महात्मा बसवेश्वर जयंती व मिरवणूक काढण्यात आली तसेच दि. ३ मे ३ जून दरम्यान राज्यात शिवा संघटनेच्या वतीने सर्व शहरांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
यात यंदा लोहा शहरात शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटना शाखा लोहा तालुका यांच्या वतीने लोहयात महात्मा बसवेश्वर जयंती दि. ११-५-२०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली यात महात्मा बसवेश्वर यांचा घोड्यावर जिवंत देखावा करण्यात आला. तसेच या मिरवणुकीत ढोलकी पथक,बॅड पथक ,लाॅऊड स्पीकर, भजनी मंडळी आदीचा सहभाग होता भगवे झेंडे पेठे बांधुन भजणी मंडळी महात्मा बसवेश्वरांचे गीत गात होते शिवा संघटनेचे मावळे नारे देत होते मिरवणूकीचा उत्कृष्ट देखावा करण्यात आला होता महात्मा बसवेश्वर जयंती लोहा शहर कमानी व बॅनर ने सजले होते.
लोहयात दि.११ मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त जुना लोहा येथील महादेव मंदिरापासुन ते व्यंकटेश गार्डन पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या भव्य मिरवणुकीचे विसर्जन रात्री ८ वाजता व्यंकटेश गार्डन येथे झाले.
यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावर भाषणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर होते तर स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी होते.
तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे, कंधार पं.स.चे माजी सभापती बालाजीराव पांडागळे, शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजेनाथ तोंडसुरे, संपर्क प्रमुख अनिल माळगे , नगरसेवक केतन खिल्लारे, सरचिटणीस धनजंय कुमार, शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी राजशेखर महाराज, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना पुढे बोलताना प्रा मनोहर धोंडे सर म्हणाले की, शिवा संघटनेने शासनाला महात्मा बसवेश्वर यांची ओळख करून दिली दिल्ली येथील संसद भवनात शिवा संघटनेच्या पुढाकाराने तात्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या काळात संसदेच्या प्रांगणात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यात आला.
नांदेड येथे आयजी कार्यालयासमोर महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यासाठी शिवा संघटनेने मागणी करून पाठपुरावा केला व पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांनी तेथे मनपाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविला यांचे श्रेय त्यांना जाते पण मागणी आम्ही लावून धरली होती.
नांदेड,-लातूर, परभणी, हिंगोली चे काही चांडाळ चौकडी व नांदेड चे खासदार,लोहा -कंधार चे आमदार आमच्यातील काही हाकालपटी केलेले आमच्यातले सर्व एक होऊन शिवा संघटनेला शह देण्यासाठी एक झाले पण लोहयातील जनतेनी त्यांना नाकारले व शिवा संघटनेला स्विकारले म्हणून गेल्या १८ वर्षात सर्वात मोठी मोठी व उत्कृष्ट जयंती निघाली मी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनमंत भाऊ लांडगे, जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबाराव शेटे, गणेश घोडके यासह सर्वांचे अभिनंदन करतो असे प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले.
यावेळी शिवा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष हनमंत भाऊ शेटे, महात्मा बसवेश्वर जयंती मंडळांचे अध्यक्ष बाबाराव शेटे, शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, सरपंच कैलास धोंडे, उपाध्यक्ष साधु पाटील वडजे, देऊळगाव चे सरपंच मारोतराव सोनवळे, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, अंकुशराव कदम ,अंकुश सोनवळे राजू पिल्लोळे, सुर्यकांत आणेराव गोविंद आणेराव , सरपंच राजू महागावकर ,दगडगावे सर, यांच्यासह सर्व शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तसेच इंजि संतोष वसमतकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
