दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी • वर्षानिमित्त शनिवारी ( दि . १४ ) दुपारी चार वाजता येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘ स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ‘ या विषयावर डॉ . श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे , अशी माहिती शिवाजी विद्यापीठ आजी – माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ . प्रवीण कोडोलीकर यांनी पत्रकाद्वारे दिली . संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे , समारंभाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते होईल . पालकमंत्री सतेज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ . जयसिंगराव पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील . कार्यक्रमात शाहू विचारांचा कृतिशील वारसा जपणारे डॉ . कपिल राजहंस , शाहीर विशारद डॉ . आझाद नायकवडी , डॉ . जे . के . पवार , सुधाकर काशीद यांच्यासह कोव्हिड १ ९ व दुष्काळ परिस्थितीत नागरिकांना विविध प्रकारे मदत करून दिलासा देण्याचे काम करणाऱ्या विविध लोकांचा सत्कार समारंभ होणार आहे, विचार याप्रसंगी छत्रपती शाहू महाराजांचा कृतिशीलपणे जपणाऱ्या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे . तरी नागरिकांनी 14 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.
