दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- दि:- १४/०५/२०२२ रोजी आज तुळशीराम तांडा येथील तलावामधे कपडे धुनीसाठी आलेल्या ५ ऊस मजुर महिलांचा तलावामधे बुडून मृत्यु झाला. एकाच कुटुंबातील आई आणी दोन मुली आणी दुसर्या दोघी अश्या ५ जणींच निधन झाल.यात रामापुर तांडा येथील ३ आणी मोजमाबाद तांडा येथील २ महिलांचा समावेश आहे.
तळ्यावर मदत करणारे पोहोचण्यास उशिर झाला आणी खुप शर्थिचे प्रयत्न करुनही त्यांना वाचवू शकले नाही याचे खुप दुख वाटत आहे. हे सर्व कामगार शिद्धी सुगर्स कारखाना येथे कामास होते.
ते काही आता परत येणार नाहीत. पण त्यांच्या उध्वस्त झालेल्या परीवारास शासन व कारखाना काही मदत देऊन आधार द्यावे अशी विनंंती आहे
बंजारा समाजातील पाच महिलांचा तळ्यात बुडून मृत्यू
१४ मे २०२२ ची तुळशीराम तांडा तालुका ता.अहमदपूर जि लातूर येथील घटना.
मोजमाबाद पांडा आणि रामापूर तांडा तालुका पालम येथील बंजारा समाजाची कुटुंब काम करण्यासाठी अमदपुर तालुक्यातील उजना गावच्या शिवारामध्ये आलेली होती.
तुळशीराम तांडा जवळील तलावांमध्ये सकाळी महिला कपडे धुण्यासाठी गेलेली असताना एकीचा पाय घसरला आणि तिला वाचण्यासाठी बाकी गेलेल्या पाचही महिलांना जलसमाधी मिळाली.
ही दुर्देवी घटना सकाळी साडे आठच्या दरम्यान घडली.
मयत मुली आणि महिलांची नावे
१ राधाबाई धोंडीबा आडे रामपूर तांडा वय ४५ वर्ष
२ काजल धोंडीराम आडे वय १९ वर्षे राहणार रामपूर तांडा
३ दीक्षा धोंडिबा आडे वय वर्ष २२ राहणार रामपूर तांडा
४ सुषमा संजय राठोड राहणार मोजमाबाद तांडा तालुका पालम वय २१ वर्ष
५ अरुणा संजय राठोड राहणार मोजमाबाद तांडा वय २५ वर्ष
अशा पद्धतीने मयत महिलांची नावे असून उत्तरीय तपासणीसाठी अहमदपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेले आहेत
केवळ पोट भरण्यासाठी आलेल्या बंजारा समाजातील गरीब कुटुंबावर अचानक हा घाला आलेला असून संपूर्ण बंजारा समाजात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अमदपुर तालुक्याचे आमदार माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांनी तात्पुरती मदत म्हणून काही आर्थिक मदत केल्याचे कळाले आहे.
या तालुक्याचे आमदार माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांना समाजा तर्फे विनंती करण्यात येते की सदरील कुटुंबाचे संसार उध्वस्त झालेले असून त्यांना शासनाकडून जी काही मदत मिळवून देता येईल तेवढी मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करावेत ही विनंती
