दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- रामेश्वर केरे
लायन्स क्लब वाळूज औरंगाबाद व क्रिएटिव्ह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स आय हॉस्पिटल चिकलठाणा यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते; हे शिबिर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हिंदवी कॉम्प्लेक्स, उज्वलयोग ऍग्रो सर्व्हिसेस जवळ आयोजित करण्यात येते आजच्या पाचव्या शिबिरात एकूण 120 रुग्णांची तपासणी झाली असून पैकी 40 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवडले गेले आहेत.
आतापर्यंत एकूण चार शिबिर पूर्ण झाले आहे आजचे पाचवे शिबिर होते. आता पर्यंत १६०० रुग्णांची नेत्रतपासणी व १६० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे ट्रस्टी फादर विल्फ्रेड सल्डणा, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, लायन्स क्लब वाळूज औरंगाबाद चे अध्यक्ष लायन्स दयाल डिडोरे ,सेक्रेटरी लायन्स अशोक भालेकर, प्रकल्प प्रमुख लायन्स योगेश धोत्रे, लायन्स रणजीत चव्हान, लायन्स अमोल धोत्रे, लायन्स उज्वला धोत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री.संजय लोहोकरे यांनी गरजू ची सेवा करणे ईश्वरसेवा आहे. क्लबच्या मार्फत सुरु असलेले कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन केले.
फादर विल्फ्रेड सल्डणा यांनी मदर तेरेसा सेवाभाव समाजाला कसा उपयोगी ठरला या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सूत्र संचालन उदय तगरे यांनी केले. लायन्स योगेश धोत्रे यांनी प्रास्ताविक केले. अमोल धोत्रे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश मोरे, राधिका जाधव, वैष्णवी जाधव यांनी सहकार्य केले.
