दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
आज दिनांक २/९/२०२२ रोजी पोलिस मुख्यालय येथे गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत सनीज् स्प्रिंगडेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले.
या स्पर्धेचा विषय अत्यंत कठीण होता. *”धर्माशिवाय विज्ञान पांगळे आहे,विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे.”* असा तो विषय होता.
या स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी होते.
१) ऋषी कहालकर
२) आर्या रामटेके
३) शर्वरी जुवार
४)अस्मी गेडाम
५) समृद्धी झंझाड
६)सौम्या मेंढे
त्यातील ऋषी कहालकर , शर्वरी जुवार व समृद्धी झंझाड यांनी विषयाच्या बाजूने आपले मत मांडले. तर आर्या रामटेके, अस्मि गेडाम व सौम्या मेंढे यांनी विषयाच्या विरोधात आपले मत मांडले.
या स्पर्धेत आर्या सुशील रामटेके वर्ग दहावीच्या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक ऋषी अतुल कहालकर व शर्वरी नारायण जुवार या दोन विद्यार्थ्यांनी पटकावला.
या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल सत्यमेव एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सुनील मेंढे, कोषाध्यक्षा शुभांगी मेंढे व संचालक विनयअंबुलकर ,अजित आष्टीकर शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर ,के.जी. प्रमुख कल्पना जांगडे यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
