दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर :पोलीस ठाणे देगलुर येथे कार्यरत आसलेले १. पो.हे.कॉ १६३६ राजाराम चंदरराव मिरदोडे २. पो.हे.कॉ १६६६ शेख अहमद कालेजी यांना सहा पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांना सहा पो. उप निरीक्षक हे पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. व तसेच ३. पो. ना ८३३ रामचंद्र सदाशिव तेलंगे ४. पो. ना ११९२ रामचंद्र गंगाराम तेलंगे यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाल्याने या चारही पोलीस कर्मचारी यांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे व पो.स्टेचे इतर पोलीस अधिकारी / आमलदार यांचे उपस्थीतीत पो.स्टे प्रारंगणात स्टार व फिती लावुन गैरवण्यात येवुन सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
