दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…या गजरात अंजनगाव सुर्जी येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडले.विसर्जन मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची नजर व पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अंजनगाव व सुर्जी भागातील मुख्य मार्गावरून सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका काढण्यात आल्या.ढोल,ताशे,लाऊडस्पीकर सह विविध वाद्यांचा मिरवणुकीमधे सामावेश होता.
यावेळी मिरवणुकीला भर पावसात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.पावसामुळे कुठलेही गालबोट न लागावे म्हणून गणेश मंडळांनी सुद्धा योग्य दक्षता घेतली.गणेश मूर्ती विसर्जन शांततेत पार पडव्यात म्हणून अंजनगाव सुर्जीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाचे पथक,होमगार्ड आदींसह शेकडो कर्मचारी बंदोबस्तात आपली चोख भुमिका बजावली.यावेळी तहसील कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी,तलाठी कर्मचारीसह सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा योगदान दिले.
