दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
———————-
खानापुर( दि.१२) देगलूर तालुक्यातील
खानापुर येथील गुणवंतराव अमृता पाटील केरले गुरुजी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ८० वर्षाचे होते. त्यानी स्वतः शिस्तबद्ध राहुन दुसऱ्याला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले, शिक्षक,कसा असावा हा आदर्श त्यांनी घालून दिला, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची वेगळी कला होती . त्यांनी अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले पण कुठेही बडेजावपणा दाखवला नाही.
भगवंतांविषयी अत्यंत निष्ठेने पुजा पाठ करायचे, त्यांना बाह्य भक्ती पेक्षा आंतरीक भक्तीचे होते. अशा कर्तव्यदक्ष गुरुजींना आज सोमवार या पवित्र दिवशी वैकुंठगमन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार मुली व नातु,पंतु असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
