दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी .
———————-
देगलूर( दि.१६) देगलूर तालुक्यातील मौजे वझरगा येथील शालेय शिक्षण घेण्यासाठी किमान तीस ते पस्तीस विद्यार्थी असून यांना रोज सकाळी देगलूर येण्यासाठी या मार्गावरील एकही देगलूर महामंडळाची लालपरी थांबत नसल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत येण्यासाठी विलंब होत आहे व आमच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी वझरगा येथे बस थांबविण्यात यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे निवेदन देगलूर येथील आगार प्रमुखांना वझरगा येथील चालू वार्ताचे पत्रकार माणिक सुर्यवंशी, बालाजी टाकळे, ज्ञानेश्वर कोकणे, देविदास कोकणे, संजय सूर्यवंशी,स्वाती सुर्यवंशी,, ऋतूजा सुर्यवंशी,ऐैश्वर्या , मालती कोरे, व अनेक विद्यार्थिनींनी निवेदन दिले.
