दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जालना ते नांदेड दरम्यानच्या बुलेट ट्रेन साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादीत जमिनीसाठी हेक्टरी प्रत्येकी एक करोड रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
महामार्ग संघर्ष समिती तर्फे परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना देण्यात आलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. त्यात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, भूसंपादन करताना शेतकऱ्यांना अगोदर पूर्व कल्पना देण्यात यावी ज्यामुळे पिके व अन्य कामकाजासंबंधींचे नियोजन लावणे शक्य होईल. जालना ते नांदेड दरम्यानच्या बुलेट ट्रेन भूसंपादन निर्णय समितीमध्ये प्रत्येक तालुक्यातून दोन व्यक्तींचा समावेश करण्यात यावा. भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना शैक्षणिक प्रगतीनुसार नोकरीची संधी देण्यात यावी असेही म्हटले आहे. या निवेदनावर तालुक्यांतून प्रत्येकी दोन भूसंपादीत शेतकऱ्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी ४ टन रेशनचा तांदूळ पकडला, गुन्ह्याची नोंद केली
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या इराद्याने नेला जात असलेला चार टन रेशनचा तांदूळ पकडला आहे.
स्था.गु.शा.पथकाला या प्रकरणाची खबर मिळताच सापळा रचून वसमत रोडवरील नांदगाव फाटा येथे एक टेंपो शिताफीने पकडला. ज्यांचा क्रमांक एम्एच् २२ एन् ३५५७ असा आहे.
स्था.गु.शा.पथकाचे पो.उप निरिक्षक मारुती चव्हाण, पोलीस कर्मचारी दिलावर खान, परसराम गायकवाड यांनी चोरीच्या इराद्याने पळवून नेला जात असलेला टेंपो व रेशनचा ४ टन तांदूळ ताब्यात घेतला आहे. आरोपित संदेश बालासाहेब खंदारे, तामील देविदास सरोदे आणि एक अल्पवयीन मुलगा असे तीन जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
चैन स्नेचिंग गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी, सेलू पोलिसांनी चैन स्नेचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाने संयुक्त रित्या कारवाईत चैन स्नेचिंग करणारे वैभव लिंबाजी पांचांळ व संदीप तुकाराम काकडे नामक दोन सराईत गुन्हेगार मुसक्या आवळून जेरबंद केले आहेत. त्यांनी या गुन्ह्याची कबूली दिली असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक याप्रकरणी पुढील तपास करीत आहे. सदर गुन्हेगारांनी यापूर्वी कुठे कुठे अशा प्रकारचा डल्ला मारला आहे त्यात किती दागिने लंपास करुन पोबारा केला आहे, याचाही तपास उजागर होऊ शकेल अशी आशा अपेक्षित आहे.
बेहोश करुन मुले पळवणाऱ्या टोळीचे पोलिसांना आव्हान !
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””
घराबाहेर खेळणारे वा रस्त्यांवर फिरणाऱ्या मुलांना बेहोश करुन पळवणाऱ्या टोळ्या सर्वत्र फिरत आहेत. कशाचं तरी अमिष दाखवून नंतर त्यांना बेहोश करुन पोबारा करणाऱ्या टोळ्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
रस्त्यांवर खेळणारी, न कळत कुठे तरी फिरणारी किंवा शाळेतून एकटाच घरी जाणारी मुले कुठे दिसतात का, यांच्या मागावर असणाऱ्या टोळ्या सध्या सर्वत्र फिरत असल्याची वदंता आहे. एकटा दिसणाऱ्या मुलांना प्रथम कशाचा तरी बहाणा करुन त्यांच्याशी सलगी साधायची व नंतर बेहोश करुन आडोशाला उभे आलेल्या वाहनातून लंपास करायचे अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या भीतीने नागरिकांमध्ये कमालीची भिंती निर्माण झाली आहे.
अशीच एक घटना परभणी येथील शाळेतून नावकी येथे राहाणारा मनिष भुसारे नामक मुलगा आपल्या घरी जात होता. पाळतीवर असलेल्या या टोळीपैकी काहींनी सावज आल्याचे हेरले व त्याला मध्येच गाठून बेहोश केल्याची व नंतर रेल्वेने पळवल्याची घटना उजागर झाली आहे.
…..सेलू स्थानकात गाडी येताच त्या मुलाला होश येताच त्यांने आपला जीव धोक्यात घातला व चालत्या गाडीतून उडी मारली. त्यानंतर पलायन करीत त्याने थेट पोलीस ठाणे गाठले व आपबिती व्यथा पोलिसांपुढे कथन केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घाबरलेल्या सदर मुलाला घरी सोडण्याची व्यवस्था केली.
नशीब बलवत्तर म्हणून भुसारे यास सुचलेली बुध्दी व दाखवलेले धाडस प्रसंगी जीवावरही बेतले असते परंतु कधीही मरायचेच आहे याची खूनगाठ बांधून त्याने केलेले पलायन व गाठलेले पोलीस ठाणे हे धाडशी प्रयत्न कौतुकास्पद असेच म्हणावे लागतील. परंतु सगळीच मुले भुसारे न बनता पूरती घाबरली जातात व शेवटी अशा टोळ्यांचे शिकार बनले जातात. पोलिसांपुढे अशा घटनांचे व टोळ्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. घाबरले जाणाऱ्या पाल्यांना सुरक्षा व पालकांना दिलासा देण्याची जबाबदारी सुध्दा निर्माण झाली आहे एवढे नक्की.
