दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील मौजे वझरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाषण केले. यामध्ये स्वाती सुर्यवंशी, दिव्या कोकणे, पांडुरंग सुर्यवंशी, या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व्यंकटराव जालणे, नांदेड जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समिती स्विकृत सदस्य तथा मुख्याध्यापक बस्वराज पाटील वन्नाळीकर, सरपंच प्रतिनिधी, रुक्माजी औरादे, मुळे सर, शालेय समिती अध्यक्ष वसंतराव सुर्यवंशी, गोविंदराव जालणे,शिवाजी कोकणे ग्रामपंचायत सदस्य, सायलू कोंडावार ग्रामपंचायत सदस्य , योगेश कोकणे, बालाजी टाकळे,दत्ता कोकणे, संजय सूर्यवंशी, शिवाजी वझरगेकर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सौ मिरगाळे मॅडम, कांबळे मॅडम, गंगाबाई वझरगेकर, कविताबाई कोकणे, हनमाबाई सूर्यवंशी, ईराबाई टाकळे, व गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते .
