दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-धामणगाव रेल्वे,चांदुर रेल्वे येथील पंचायत समिती भवनात महसूल,कृषी,पिक विमा,बँक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आ.प्रताप अडसड यांनी घेतली.दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त झाले.मात्र अनेक वेळा काही तलाठ्याने यादीमध्ये चुका केल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही.शासन अनुदान हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देते यात काही तलाठी नेहमी हयगय करीत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करावी असे आ.प्रताप अडसड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.तसेच बँकेने शेतकऱ्यांना त्यांच्या कामांसाठी ताटकळत ठेवू नये असे बँक प्रतिनिधींना निर्देश सुद्धा दिले.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.पीक विम्याच्या प्रलंबित प्रस्तावावर पाच दिवसात कार्यवाही करावी असे निर्देश पिक विमा कंपनीला यावेळी आ.प्रताप अडसड यांनी दिले.
