दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
क्षञिय कुळवंशातील दैवी कुळाशी थेट संबंध असणारा , अंत्यंत शुर ,चंचल, तेजस्वी,ज्ञानी असणारा वंजारी समाज व नाथ संप्रदायाचे सद्गुरु संत अवजीनाथ महाराज, सद्गुरु वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा कुलदैवत रेणुकामाता व स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब राजकिय दैवत मानणारा हा समाज व या समाजाच देशातील पहिल साहित्य संमेलन वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित दिनांक 25/12/2022 रोजी वार वेळ रविवार सकाळी 8 ते 7 वाजेपर्यंत मराठा विद्या प्रसारक समाज रावसाहेब थोरात सभागृहा नाशिक येथे आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल. असं मत संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सु प्रसिद्ध साहित्यिक प्रा वा ना आंधळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विदर्भ साहित्य रत्न जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबारावजी मुसळे हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत यासोबतच राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन समाजाला नवी दिशा देणार आणि राज्यपातळीवर व्यासपीठ म्हणून भुमिका पार पाडेल सदर संमेलन हे मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचं व्हावं आणि वंजारी समाजाने एक आदर्श प्रस्थापित करावा म्हणून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक गणेश खाडे यांच्या सह साहित्य आघाडीच्या राज्य मार्गदर्शक सौ लता गुट्टे महिला साहित्य आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सौ शितल नागरे चोले राज्य सरचिटणीस साहित्य आघाडी सौ सिंधुताई दहिफळे यांच्यासह संमेलन यशस्वी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील खंबाळा गावाचे भुमि पुत्र सु प्रसिद्धी सी ए अकाऊंट अफिसर प्रशांतजी आंधळे व स्वागत अध्यक्ष समिती चे सदस्य सर्व सन्माननीय सदस्य आणि नाशिक शहरातील अनेक नागरिक सहकार्य करत आहेत . तसेच साहित्य संमेलन हे तीन सत्राचे होईल पहिल सत्र पहिलं पुष्प उद्घाटन सोहळा , सकाळी आठ ते एक दुपारी एक ते दोन भोजन दुसर पुष्प दुपारी दोन वाजता साहित्य परिसंवाद कथाकथन आणि संध्याकाळी पाच वाजता तिसरं सत्र तिसरं पुष्प कवी संमेलन आणि संध्याकाळी सात वाजता समारोप अशा पद्धतीने संमलेनाची रूपरेषा असुन साहित्य संमेलन हे भविष्यातील पिढीसाठी नवचैतन्य निर्माण करणार होईल या संमेलनात प्रामुख्याने , वंजारी समाज ईतिहास , खाद्य संस्कृती, सामाजिक स्थान , सामाजिक संस्कृती,तसेच समाजातील विविध समस्या अडचणी, आणि राष्ट्र निर्माणासाठी वंजारी समाजाचे योगदान, इतर समाजाच्या प्रति सर्व धर्म समभाव, सामाजिक परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणाच्या प्रति दृष्टीने बदलला पाहिजे . रोजगार व स्वयंरोजगार, उद्योगाच्या प्रति सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे. साहित्य आणि समाज यांचा समन्वय घडवून योग्य समन्वय होऊन सामाजिक संस्कृती आणि वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे भविष्यातील पिढी संस्कार युक्त घडली पाहिजे यासाठी साहित्य हे वैचारिक परिवर्तनाचे साधन आहे आणि त्याचा प्रभावी अस्त्र म्हणून वापर झाला पाहिजे . आणि साहित्य संमेलन ऐतिहासिक होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संमेलन अध्यक्ष प्रा वा ना आंधळे यांनी व्यक्त केले
