दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पिंपरी – संभाजी गोसावी
चिंचवड पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शनिवारी शाईफेक करण्यांत मंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवड श्रीमंन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमिंत्त आले असता त्यांच्या अंगावर शनिवारी अज्ञात व्यक्तीने शाईफेक केली शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला त्यामुळे शहरांत वातावरण तणावपूर्ण झाले या घटनेचा भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला गेला आहे.यावेळी चोंख पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडली. चंद्रकांत पाटील यांनी विचारमंच फुले आंबेडकर यांच्या केलेल्या वक्तृत्वांवर शाईफेक करण्यांत आली असल्यांची माहिती समोर आली आहे. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली असल्यांची चर्चा आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आले असता त्यांनी एका महापुरुषाबद्दल वक्तत्व केले होते या वक्तृत्वावरुन शाईफेक करण्यात आली असल्यांची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना तरीही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी एकाला या प्रकरणात ताब्यांत घेतले आहे. जन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाईफेक करण्यांत आल्यांमुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे.
