दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ‘वेध भविष्याचा-विचार राष्ट्रवादीचा’ हा भव्य राष्ट्रवादी संवाद मेळावा आज पार पडला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले.
राज्यातील सत्ताधारी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत.लाखो कोटींची गुंतवणूक असणारे प्रकल्प परराज्यात गेल्यामुळे बेरोजगार हतबल झाले आहेत.सत्ताधारी महापुरुषांबद्दल गरळ ओकण्यात व्यस्त आहेत.महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना पाठीशी घातलं जात आहे.
सीमावादावरुन मराठी भाषिकांवर अन्याय होत असतानाच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील आणखी गावं घेण्याची भाषा केली जात आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ब्र शब्द काढायला तयार नाहीत. यामागे नेमके गौडबंगाल काय याबद्दल जनतेनं विचार करण्याची गरज आहे.
