दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
लोहा :- लोह्यातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन आंबेडकरी संघटनांनी केले आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले कर्मविर भाऊराव पाटील यांच्या विषयी आपमानजनक वक्तव्य भिक मागुन शाळा सुरू केली असे बेताल वक्तव्य केले आहे या सर्व विषयी मंत्री चंद्रकांत पाटील याची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वर शाही फेक करणारा भिम सैनिक मनोज गरबडे याचावर दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घेण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे लोहा तहसील कार्यालयात जाऊन आज निवेदन देण्यात आले
या निवेदनावर अनिल दादा गायकवाड रिपब्लिकन सेना महाराष्ट्रवाडा संघटक,बालाजी खिल्लारे सचिन खटाव छत्रपती घुतमल, केतन खिल्लारे, मनोज निखाते, संतीश निखाते , पंचशील कांबळे ,बबनराव निर्मल, गंगाधर महाबळे ,युवा नेते शिवराज दाढेल आदीचा सह्या आहेत.लोहा शहरातील व्यापारी बांधवांनी आपले दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आंबेडकरी संघटनांनी केले आहे.
