दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात ०४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड, गोविंद डिगोळे, विभाग प्रमुख संतोष चामले , विलास शिंदे, प्रा. प्रदीप कोठारे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर गायकवाड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, ०४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंद डिगोळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, नौदल दिन भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाने भारतीय नौदलाच्या भूमिकेचा सन्मान केले पाहिजे.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, नौदल दिनानिमित्त परेड, सांस्कृतिक यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. या कार्यक्रमांद्वारे जनतेला नौदलाची ताकद आणि तांत्रिक प्रगतीची जाणीव करून दिली जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर गायकवाड, गोविंद डिगोळे, सुनील महिंद्रकर यांनी सहकार्य केले.
