दैनिक चालु वार्ता म्हसळा (रायगड )प्रतिनिधी – अंगद कांबळे
. म्हसळा -१४एप्रिल २०२५ रोजी रा. जि .प .प्राथमिक- शाळा, केंद्र वरवठणे ता म्हसळा या शाळेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त शाळेत वकृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , अध्यक्ष, उपाध्यक्षा , शिक्षण प्रेमी, समाजसेवक किशोर येलवे, आदर्श शिक्षिका संगिता आंबेडकर मॅडम,माध्यमिक शिक्षक संभाजी शिंदे सर , शिक्षण प्रेमी अजय पयेर, उपशिक्षक रामेश्वर गायकवाड सर, मुख्याध्यापक जयसिंग बेटकर सर, सर्व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
