
केरळातील मलप्पुरममध्ये रविवारी एक विलक्षण घटना घडली. समुद्रात जाळे टाकताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासे नव्हे तर नागदेवताच्या दोन मूर्ती अडकल्या.
ओझिकोडजवळील पुथिया कडप्पुरम येथील रहिवासी रसल मासेमारी करत असताना हा प्रकार घडला.
पीतळेच्या बनवलेल्या या प्रत्येक मूर्तीचे वजन सुमारे पाच किलो आहे. रसलला या मूर्तींबाबत काय करावे हे कळेना, त्यामुळे त्याने त्या थेट तानूर पोलीस ठाण्यात नेऊन सुपूर्द केल्या. पोलिसांनी सांगितले की, “या मूर्ती समुद्रात कशा आल्या याचा शोध घेत आहोत. सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.” अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की अद्याप या मूर्ती चोरीच्या आहेत की कुणी टाकून दिल्या आहेत, हे ठरलेले नाही. “जर मूर्ती चोरीच्या असतील तर या बातमीमुळे त्यांचा मालक पुढे येईल,” असही पोलिसांनी सांगितले. सध्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. fisherman-gets-snake-idol मच्छीमारांच्या जाळ्यात अनेकदा वेगवेगळ्या वस्तू सापडतात, पण नागदेवतेच्या मूर्ती मिळणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच या मूर्ती किती जुन्या आहेत याचा तपास सुरू आहे.