
तर महागात पडेल चायनाची अमेरिकेला थेट धमकी; ट्रम्प यांना त्यांच्यात भाषेत उत्तर…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाहीयेत, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्या पैशांचा उपयोग हा रशिया आणि युक्रेन युद्धासाठी फंडिग म्हणून होत आहे, त्यामुळे भारतावर आपण 50 टक्के टॅरिफ लावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर ट्रम्प यांनी एच-1बी (H-1B) व्हिसावरील शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली, याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा चीन भारताच्या मदतीला धावला आहे. चीनने अमेरिकेचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.
आंतरराष्ट्रीय स्थरावर चीनने दोन प्रमुख मुद्द्यांवरील आपलं मौन अखेर तोडलं आहे. यातील एक मुद्दा हा थेट भारताशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं आरोप करण्यात येत आहेत की, भारत आणि चीन रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत आहेत, हा पैसा रशिया युक्रेनसोबतच्या युद्धासाठी वापरत आहे. मात्र यावर आता चीनने आक्रमक भूमिका घेत ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आहे. रशियाकडून तेल खरेदी करणारे देश रशियाला फंड करत नाहीयेत, तर युरोपीयन संघच रशियासोबत व्यापर करत आहे, असं चीनने म्हटलं आहे. दुसरीकडे इस्रायलच्या एका खासदारानं नुकताच तैवानचा दौरा केला होता, या दौरावरून नाराजी व्यक्त करत चीनने इस्रायला देखील सुनावलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना पुन्हा एकदा भारत आणि चीनवर गंभीर आरोप केले होते. चीन आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे रशियाला युद्धासाठी फंड उपलब्ध होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर बुधवारी चीनने आक्रमक भूमिक घेत अमेरिकेला चांगलंच सुनावलं आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांमुळे युद्धासाठी मदत होत नाही तर युरोपीयन महासंघाचाच रशिया सोबत व्यापर सुरू आहे, असं चीनने ट्रम्प यांना म्हटलं आहे. एवढंच नाही तर चीन आणि रशियाचा व्यापार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमानुसार सुरू आहे, जर त्याच्यामध्ये कोणी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी कठोर पाऊलं उचलू अशी थेट धमकी देखील चीनने अमेरिकेला दिली आहे.