
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-वकिलांनी वकिली व्यवसाय करत असताना आपल्या पक्षकारास केस जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी द्यावी आणि त्यांच्याशी प्रामाणिक रहावे असे मत मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील यांनी केले,ते मुंबई उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करणारे ॲड भाग्यश्री मांगले शिंगाडे आणि ॲड अमर शिंगाडे यांच्या करमाळा शहरात कोर्टा समोर नवीन ऑफीसचे उद्घाटन ॲड अनिकेत निकम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी पक्षकार आणि वकील यांच्या व्यावसायिक नात्यातील संबंधां विषयी व्यक्त केले.
ॲड अनिकेत निकम पुढे म्हणाले की ॲड भाग्यश्री मांगले या उच्च न्यायालयात आपल्या पक्षकाराची अतिशय अभ्यासपूर्ण व प्रामाणिक पणे बाजू मांडतात. असे म्हणून त्यांनी ॲड भाग्यश्री मांगले यांचे कौतुक केले व ॲड अमर हे पक्षकाराना न्याय मिळवा म्हणून कसोशीने प्रयत्न करत आहेत असे सांगितले आणि वकील व्यवसायासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी विद्या विकास संस्थेचे सचिव श्री विलासरावजी घुमरे सर म्हणाले की माझे व वकिलांचे अनेक वर्षांपासूनचे जूने संबंध आहेत आणि करमाळा तालुक्यातील वकील हे प्रामाणिक व सचोटीने व्यवसाय करतात असे म्हणून मांगले व शिंगाडे यांच्याशी कौटुंबिक संबंध असून आमची मुलगी आणि जावई असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड अनिकेत निकम साहेब यांचा करमाळ्याची प्रसिद्ध देवी कमलाभवाणी मातेची फोटोफ्रेम, पुष्पबुके, शाल, फेटा देऊन तसेच उद्घाटक, प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच नवीन ऑफीसचे उद्घाटन झाल्यानंतर विद्या विकास संस्थेचे महाविद्यालय येथे विद्यार्थ्यासाठी ॲड अनिकेत निकम साहेब यांचे कायदेविषय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सदर व्याख्यानात कायदे विषयक माहिती देऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय ठेऊन सर्वागीण शिक्षण घ्यावे आणि शिक्षित होण्याबरोबर संस्कारित होऊन या देशाचे सुद्य व सुजान नागरिक व्हावे आणि समाजाची सेवा करावी असे आवाहन केले त्याचवेळी त्यांनी संस्थेच्या कामाचे भरभरून कौतुक केले, ॲड निकम साहेब यांचा महाविद्यालयाने शाल, फेटा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे. तत्पूर्वी त्यांनी सकाळी करमाळा शहरातील कमलाभवानी मातेचे दर्शन घेऊन उद्घाटन कार्यक्रम स्थळी आले होते.
उद्घाटन सोहळ्यात यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील सिनिअर वकील ॲड.ई.ए. शशी, ॲड रेखा मुसळे, तसेच मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ रश्मी दीदी बागल, बार्शी येथील ॲड निखिल पाटील अणि प्रमुख पाहुणे म्हणून ॲड राजेश दिवाण, ॲड कमलाकर वीर, ॲड जयदीप देवकर, ॲड बळवंत राऊत, ॲड सुहास मोरे, ॲड नानासो शिंदे, करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड रामभाऊ निळ, उपाध्यक्ष ॲड विनोद चौधरी, सचिव ॲड अलिम पठाण, माजी पंचायत समिती सदस्य ॲड राहुल सावंत, ॲड नितीन राजगुरू आणि करमाळा बार असोसिएशनचे सर्व पुरुष आणि महिला ॲड सदस्य, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, मांगले शिंगाडे यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, परिसरातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.