
आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये रिंकू सिंहने विनिंग शॉट मारला. पीचवर असलेल्या रिंकू सिंहने विनिंग शॉट मारताच मैदानावरील प्रेक्षकांसह संपूर्ण देश सेलिब्रेशनमध्ये बुडून गेला.
दुबईमध्ये झालेला हा सामना खूपच रोमांचक ठरला. रिंकू सिंहची भावी पत्नी खासदार सरोज यांनी विजयाचा आनंद सोशल मीडियावर जाहीर केला. तिने इंडियन क्रिकेट टीमच्या प्लेयर्सचा पोस्टर शेअर केला. इंडिया, इंडिया लिहून देशाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
रिंकू सिंह जेव्हा विचारलं की, टुर्नामेंटमध्ये तू किती चेंडू खेळलायस त्यावर त्याने हसून फक्त एक असं उत्तर दिलं. ‘जितके चेंडू मिळाले असते, तितकं टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं असतं. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. सगळ्यांना माहितीय मी फिनिशर आहे, त्यासाठीच ओळखला जातो. तीच संधी आजही मिळाली होती. एक चेंडू मिळाला, टीम जिंकली, वातावरण खूप चांगलं आहे’ असं रिंकू सिंह म्हणाला.
फोटो शेअर केला
विनिंग शॉटनंतर रिंकू सिंहच प्रिया सरोज बरोबर फोनवर बोलणं झालं. दोघांनी आनंद व्यक्त केला. रिंकू सिंह सोबत झालेल्या बोलण्याचा फोटो खासदार प्रिया सरोजने सोशल मीडियावर शेअर केला.
काय भविष्यवाणी केलेली?
रिंकू सिंहला जेव्हा विचारण्यात आलं की, देवाच्या प्लानवर तुम्ही विश्वास ठेवता, त्यावर रिंकू बोलला ‘हो, मला वाटतं देवाने लिहून ठेवलय’ त्यानंतर रिंकू सिंहने पेपरवर त्यानेच लिहिलेली एक नोट दाखवली. यावर विनिंग शॉटबद्दल लिहिलेलं. रिंकू सिंहने सांगितलं की, हे त्याने आशिया कप सुरु होण्याआधी लिहिलेलं. रिंकूने आशिया कप सुरु होण्याआधी भविष्यवाणी केलेली की, विनिंग शॉट तोच मारणार.