
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -एकनाथ गाडीवान.
देगलूर. तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्षा चैतन्याताई वानखेडे व संघटनेतर्फे तहसीलदार भारत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचे अन्याय न होता पंचनामा न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून सर्व कर्जमाफी करण्यात यावी. गेल्या दीड-दोन महिन्यापासून झालेल्याअतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला असून,बी-बियाणे लागवड स्वखर्चाने करून सुद्धा मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे खोटे आश्वासन न देता सरसकट मदत व कर्जमाफी करावी असे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निवेदनात स्पष्ट केले आहे.काही नेते मंडळी अतिवृष्टीचे पाहणी करून केवळ आपले फोटो काढून दिखावा निर्माण करत आहेत.परंतु जिजाऊ ब्रिगेडची संघटना यावर ठोस निर्णय घेऊन कुठल्याही प्रकारची पंचनामे न करता तात्काळ दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत तात्काळ मदत करून संकट दूर करावे.यावेळी जिजाऊ ब्रिगेडचे तालुकाध्यक्षा चैतन्याताई वानखेडे,सचिव रंजनाताई मानुरे,कार्याध्यक्ष दिपालीताई,वानखेडे संगीताताई कदम व मार्गदर्शक सुजताताई वानखेडे सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.