दुबईत तेजस अपघातात शहीद झालेले कोण आहेत नामांश स्याल ?
शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल शहीद झाले. ३७ वर्षीय नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही बातमी समजताच शुक्रवारी संध्याकाळपासूनच जिल्ह्यातील नागरोटा बागवान भागातील पटियालकर गावात विंग कमांडर यांच्या घरी नातेवाईकांसह संपूर्ण गावाने गर्दी केली होती. गावातील लोक संपूर्ण रात्र कुटुंबासोबत त्यांच्या या दुःखाच्या सामील झाले.
पत्रकारांनी नमांशच्या मूळ गावातील घरी भेट दिली असता नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसले. शहीदाच्या घरातून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनेक महिला हंबरडा फोडून रडत असल्याचे दृश्य पाहायला मिळते. त्यामध्ये एक महिला अतिशय आक्रोशित अवस्थेत, “माझ्या मुलाचे तुकडे तुकडे झाले,”असे म्हणत आपले दु:ख व्यक्त करताना दिसते तथापि, त्या महिलेचा नमांश स्याल यांच्याशी नेमका कोणता नातेसंबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावात मात्र शोकाची वातावरण असून सर्वत्र संताप व वेदना व्यक्त होत आहेत.
कोण होते नामांश स्याल?
२०१६ मध्ये तेजस सैन्यात दाखल झाल्यानंतरचा हा दुसरा मोठा अपघात आहे. नमन सायल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बागवान तहसीलमधील पटियालकर गावचे रहिवासी होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि शांत, नमन यांनी लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सुजानपूर तिराच्या सैनिक शाळेत पूर्ण केले. ही शाळा भारतीय सैन्य आणि हवाई दलासाठी अनेक उत्कृष्ट अधिकारी निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. बालपणापासूनच त्यांनी अभ्यास आणि खेळ दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. शालेय जीवनात असतानाच त्यांनी भारतीय हवाई दलात भरती होण्यावर लक्ष केंद्रित केले होते. २४ डिसेंबर २००९ रोजी त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले आणि इथूनच त्यांचे खरे उड्डाण सुरू झाले.
देशातील अत्याधुनिक विमाने उडवण्याचा मान नमन स्याल यांना
दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी तेजस लढाऊ विमान सादर करण्याची जबाबदारी नुकतीच नियुक्त झालेल्या तिसऱ्या तेजस स्क्वॉड्रनमधील विंग कमांडर नमन स्याल यांच्यावर सोपवण्यात आली होती. देशातील अत्याधुनिक आणि गुंतागुंतीची अनेक विमाने उडवण्याचा अनुभव त्यांना होता. लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी आपली उल्लेखनीय क्षमता सिद्ध केली होती.
देशसेवेची परंपरा असलेले कुटुंब
विंग कमांडर नमन स्याल यांच्या कुटुंबात देशभक्तीची पक्की परंपरा आहे. त्यांच्या वडिलांनी-जगन्नाथ स्याल-भारतीय सैन्याच्या वैद्यकीय कोर्प्समध्ये सेवा केली असून निवृत्तीनंतर हिमाचल शिक्षण विभागात प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला. नमन यांची पत्नी अफसान या भारतीय हवाई दलात अधिकारी आहेत. पाच ते सहा वर्षांची मुलगी ही संपूर्ण कुटुंबाची लाडकी आहे.
घटनेच्या दिवशी नमन यांची आई बीना देवी हैदराबाद येथे मुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी नमन स्याल तैनात असलेल्या एअरबेसवर होत्या. तर नमन यांची पत्नी कोलकात्यातील एक अभ्यासक्रमासाठी गेल्या होत्या आणि त्यांचे पालक तामिळनाडूमधील सुलूर एअरबेसवर उपस्थित होते.
नमांशची आई धक्क्यात; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
विंग कमांडर नमांश स्याल यांचे कुटुंब मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील असले तरी सध्या ते तामिळनाडूतील कोयंबतूर येथे वास्तव्यास आहे. दुबईतील एअर शोमध्ये भाग घेण्यासाठी नमांश गेल्या काही दिवसांपासून तैनात होते, तर त्यांची पत्नी-जी स्वतः हवाई दलात विंग कमांडर आहे-कोलकात्यातील प्रशिक्षणासाठी गेली होती. त्यांना सात वर्षांची आर्या स्याल ही मुलगी असून ती संपूर्ण कुटुंबाची लाडकी आहे.
दोन आठवड्यांपूर्वीच नमांशचे वडील आणि आई-वीणा स्याल-कांगडाहून कोयंबतूरला आर्याची काळजी घेण्यासाठी आले होते. मुलाच्या निधनाची बातमी मिळताच वीणा स्याल यांना मोठा धक्का बसला असून त्या अत्यंत शोकाकुल अवस्थेत आहेत. नमांशचे वडील सांगतात, “ही दु:खद बातमी ऐकल्यापासून त्या कोणाशीही बोलू शकत नाहीत.


