
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
अनेक वर्षांपासून देगलूर शहरात विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या भायेगाव रोड भागातील आई दुर्गे दुर्गेश्वरी नवरात्रोत्सव समितीकडून यावर्षी देखील अनेक उपक्रम घेण्यात आले. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, युवक यांना प्रोत्साहित करण्यासाठी अभ्यासपूर्ण तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील घेण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झालेल्या मित्रमंडळाने दुर्गादेवी प्रतिष्ठापनेच्या माध्यमातून सार्वजनिक उत्सवाला केवळ धार्मिक आयाम न देता त्याद्वारे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
दिनांक 30 सप्टेंबर रोजी बालाजी अण्णा रोयलावार मित्र मंडळ व आई दुर्गे दुर्गेश्वरी नवरात्र उत्सव समिती आयोजीत कीर्तन सोहळा सुप्रसिद्ध ह.भ.प निरंजन भाईजी महाराज वसुरकर [आळंदी] यांच्या मधुर वाणीत पार पडला..
यावेळी रामदास पाटील सोमठाणकर त्यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बालाजी रोयलावर, देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे , बालकवी श. ल. नाईक ,नगरसेवक महेश पाटील, कैलास येसगे, प्रसिद्ध कापड व्यापारी अविनाश कोटगिरे सावकार,डॉ.कस्तुरे रामपूरकर ,पुंडलिक टोके , सुनील येशमवार, राजू मालेगावकर,माजी नगरसेवक लक्ष्मण कंधारकार, माजी सभापती लालू कोयलावर व आदी देगलूर शहर व तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.