
पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता; एक चूक नडली…
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांती पुरस्कार मिळण्यासाठी दावा करत होते. जगातील सात युद्ध मी रोखली असल्याने नोबेल शांती पुरस्कार मिळायला हवा.
ऑक्टोबरमध्ये जेव्हा नोबेल पारितोषिकांची घोषणा केली जाते तेव्हा जगाचे लक्ष विजेत्यांकडे असते. ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जाते. सर्वात अगोदर वैद्यकशास्त्र पुरस्कार जाहीर केला जातो, त्यानंतर अनुक्रमे भौतिकशास्त्र, साहित्य, रसायनशास्त्र, शांतता या विषयांसाठी पुरस्कार जाहीर केले जातात. नामांकन फक्त निवडक व्यक्तींसाठीच असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल शांती पुरस्कारासाठी दावा केल्याने हा पुरस्कार नेमका कोणाला मिळतो, याकडे जगाच्या नजरा आहेत.
विशेष म्हणजे नामांकित व्यक्ती आणि प्रस्तावकांची ओळख तब्बल 50 वर्षांसाठी गुप्त ठेवली जाते. हे धोरण निवडीची निष्पक्षता सुनिश्चित करते. प्रत्येक श्रेणीसाठी तज्ज्ञ समित्या उमेदवारांची पुनरावलोकन करतात. अल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रात नमूद केलेल्या तत्त्वांची पूर्तता करतात याची खात्री केली जाऊ शकेल. ही सर्व प्रक्रिया अत्यंत गुप्तपद्धतीने पार पडले. यामध्ये कोणाचेही हस्तक्षेप अजिबात नसतो.
नोबेल पुरस्कारासाठी सतत दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार जाहीर होण्याच्या अगोदरच मोठा धक्का बसला. दरवर्षी नोबेल पुरस्कारासाठी हजारो नावे प्रस्तावित केली जातात आणि ही यादी 50 वर्षांसाठी सुरक्षित बंद ठेवली जाते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, नाटो, हाँगकाँगचे चाऊ हाँग-तुंग आणि कॅनेडियन मानवाधिकार वकील इर्विन कोटलर यांच्या प्रतिनिधींसह तब्बल 338 नामांकित उमेदवार आहेत.
यादरम्यान काही नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले होते. परंतु त्यांचा प्रस्ताव अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 31 जानेवारीला आला, त्यामुळे ते या पुरस्कारासाठी वैध नाहीत. अमेरिकन काँग्रेसमन बडी कार्टर, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात यावा, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.