
शिंदेंनी काय दिला सल्ला…
गुंड निलेश घायवळ यांचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम आता चांगलेच अडचणीत आले आहेत. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलं आहे.
यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेली झोड उठवली आहे, पुन्हा एकदा योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, विरोधकांकडून योगेश कदम यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे, त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान त्यानंतर आता योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली भूमिका मांडली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना दिलासा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांच्या पाठीशी आहेत. चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर द्या, असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांंना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. योगेश कदम यांनी या प्रकरणानंतर आपली भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी देखील माहिती समोर येत आहे, मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना तब्बल दोन तास मुक्तागिरी बंगल्यावर ताटकळत बसून रहावं लागलं, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि कदम यांची भेट झाली. कदम यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा पक्षातील नेत्यांमध्ये सूर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यात जेवण करता -करता चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिंट चर्चा झाली आहे. जर चुकीचं काही केल नसेल तर घाबरू नका, विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, अशा सूचना यावेळी शिंदे यांनी कदम यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.