
पक्षाने नोटीस पाठवली…
एकीकडे दिवाळीच्या खरेदीची धामधुम सुरु असतानाच राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील एका विद्यमान आमदारांची पक्षांतून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर ही कारवाईची टांगती तलवार असून पक्षाकडून त्यांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. काय आहे नेमके कारण आणि प्रकरण? जाणून घ्या…
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर अजित पवार नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी आहे. नुकतेच संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी फक्त हिंदूच्याच दुकानातून करा, असे आवाहन केले होते. या विधानावरुन पुन्हा एकदा अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून आज संग्राम जगताप यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
संग्राम जगताप यांच्या भूमिकांवरुन नाराजी
आज पाठवण्यात येणाऱ्या नोटीसीला संग्राम जगताप यांच्याकडून खुलासा नाही झाला तर त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. स्वत: अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. “आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे, आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोलले पाहिजे. हा शिव,शाहू,फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. मी त्याला याआधी समजावले आहे. त्याची जी भूमिका आहे, विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल,” असं अजित पवार म्हणालेत.
जलील यांनी केली होती जगतापांवर टीका
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये हिंदू- मुस्लीम संघर्ष वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एमएमआयचे नेते असुद्दीने औवेसी यांची नगरमध्ये सभा झाली होती. यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना जगताप यांनी फक्त हिंदूच्याच दुकानातून खरेदी करा, असे विधान केले आहे.