
अमेरिकेला दिला सर्वात मोठा धक्का; पुन्हा युद्ध भडकणार ?
भारतावर लावलेला टॅरिफ, H1B व्हिसाच्या शुल्क वाढीचा निर्णय, देशात करण्यात आलेली शटडाऊनची घोषणा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शातंतेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी सुरू असलेले प्रयत्न या सर्वांमुळे आता अमेरिका सध्या चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.
त्यातच आता अमेरिकेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते अशी बातमी आता समोर आली आहे, ती म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी मिसाइलच्या रेंजवर लावण्यात आलेली बंदी उठवली आहे, त्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ही बंदी उठवल्यामुळे आता इराण लांब पल्ल्याच्या मिसाईल बनवू शकणार आहे. इराणने उचललेलं हे पाऊल इराणच्या नव्या रणनीतीकडे संकेत करत आहेत. काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेनं इराणच्या अणू ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला कोला होता.
इराणचे खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अहमद बाक्शयेश अरदस्तानी यांनी याबाबत माहिती देताना सांगितली की, ही नवी मिसाईल योजना आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, यापूर्वी जास्तीत जास्त 2,200 किमी दूर अंतरापर्यंत मर्यादीत रेंजच्या मिसाईल तयार करण्याची परवानगी होती, मात्र आता ही बंदी हटवण्यात आली आहे, त्यामुळे आता आठ हजार किमी रेंजच्या मिसाईल आम्ही तयार करणार आहोत, दरम्यान इराणने घेतलेला हा निर्णय अमेरिकेसाठी सर्वात जास्त धोकादायक ठरणार आहे, कारण त्यामुळे अमेरिकेतली अनेक महत्त्वाची शहरं हे इराणच्या टप्प्यात येणार आहेत.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील त्यांच्या एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे की, इराण सध्या अशा प्रकारच्या मिसाईल बनवत आहे, ज्याची रेंज ही आठ हजार किलोमीटरपर्यंत असणार आहे. या मिसाईलच्या माध्यमातून इराण अमेरिकेतली मोठ्या शहरांना टार्गेट बनवणार आहे. मात्र दुसरीकडे इराणने सध्या तरी हा इस्रायलचा दावा फेटाळून लावला आहे, इस्रायल इराणसंदर्भात गौरसमज निर्माण करत आहे, गेल्यावेळी देखील इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात आमच्याविषयी गैरसमज निर्माण करून दिला, त्यामुळे अमेरिकेनं आमच्या अणू ऊर्जा केंद्रांवर हल्ला केला. दरम्यान दुसरीकडे इराण आणि भारताचे संबंध चांगले आहेत,इस्रायलसोबतचं युद्ध संपल्यानंतर इराणने भारताचं कौतुक केलं होतं.