 
                जगात खळबळ उडवणारी आकडेवारी पुढे; तब्बल…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने चर्चेत असणारे एक नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावत धक्का दिला. एकीकडे भारत अमेरिका यांच्यात खास संबंध आहेत, हे सांगताना अनेकदा डोनाल्ड ट्रम्प दिसले तर दुसरीकडे मोठा टॅरिफ लावत धमकावण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटले की, आम्ही भारतावर अतिरिक्त टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावत आहोत. मात्र, दुसरीकडे जगात सर्वाधिक रशियाकडून चीन तेल खरेदी करतो. मात्र, चीनवर टॅरिफ लावताना त्यांनी दुर्मिळ खनिजांची निर्यात चीनने बंद केल्याने टॅरिफ लावत असल्याचे म्हटले. चीनने जर ही निर्यात बंदी उठवली तर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा त्यांच्यावर लागणार नाही. चीन आणि अमेरिकेतील करार अंतिम टप्प्यात असल्याने चीनवर 100 टक्के टॅरिफ अमेरिका लावणार नसल्याचे स्पष्ट आहे.
अमेरिकेची सर्वात मोठी पोटदुखी हीच आहे की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतोय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच युक्रेन युद्ध इतके काळ सुरू असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला. आता भारताने मोठी चाल खेळल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होताना दिसतंय. 2022 नंतर भारताने अमेरिकेकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी केले आहे. एकप्रकारचे मोठे उत्तरच अमेरिकेला भारताने दिलंय.
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो त्यावर रिफायनरी करून त्याची निर्यात जगभरात करून नफेखोरी करून पैसा कमावत असल्याचा आरोप अमेरिकेने भारतावर केला. आता भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. भारताने अमेरिकेकडून केलेली कच्च्या तेलाची आयात ऑक्टोबर 2022 मध्ये सर्वाधिक होती. आता तणावामध्ये भारताने अमेरिकेकडून तेल आयात अधिक वाढवली आहे. ऊर्जा कंपनीच्या केप्लर आकडेवारीनुसार, 27 ऑक्टोबरपर्यंत भारताने अमेरिकेकडून प्रत्येक दिवशी 5.40 लाख बॅरल कच्चे तेल आयात केले.
जे की 2022 च्या नंतर सर्वात जास्त आहे. या महिन्यात हा आकडा 5.75 लाख बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. रशियाकडून भारत अजूनही सर्वात जास्त तेल खरेदी करतो. भारतीय रिफायनरीने अमेरिकी मिडलॅंड डब्ल्यूटीआय आणि मार्स ग्रेड यांच्याकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. भारत हा अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील व्यापार तणाव अधिक टोकाला पोहोचला आहे.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                