 
                फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागताना दिसतंय. कामात अत्यंत कुशल 24 तास ड्युटी करून 24 तास अभ्यासासाठी ऑफ संपदा मुंडे घेत. हेच नाही तर आतापर्यंतच्या काळात एकाही रूग्णाने संपदा मुंडे यांची तक्रार केली नव्हती.
मात्र, अचानक याच संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आयुष्याचा निरोप घेतला. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. असंख्य प्रश्नांची उत्तरे त्या मागे ठेऊन गेल्या आहेत. फलटण शहरात त्या किरायाने रूम करून राहत. पण आत्महत्या त्यांनी आपल्या राहत्या घरी न करता थेट शहरातील एका हॉटेलमध्ये केली. हे हॉटेल त्यांनी स्वत: दोन दिवसांसाठी बुक केले होते. यादरम्यान त्या नेहमीप्रमाणे रूग्णालयात ड्युटी देखील करत होत्या.
संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर हातावर लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली. आरोपी पीएसआयने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. प्रशांत बनकर याने आपल्याला शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख यादरम्यान त्यांनी केला. मात्र, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचेही दिसतंय. रणजीत निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही आरोप करण्यात आली.
आता नुकताच संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आलाय. यामध्ये काही मोठ्या गोष्टींबाबत खुलासा झाला. सातारा पोलिस अधिक्षकांनी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली असून त्यांनी म्हटले की, संपदा मुंडे यांनी रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली. आता त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला असून पुढील तपास हा त्यानुसार केला जाईल.
काल अनेकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर शवविच्छेदना अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यावर बोलता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. मात्र, डॉक्टर संपदा मुंडे यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात कुठेही याबाबतचा उल्लेख करण्यात आला नाही. दीडच्या आसपास संपदा मुंडेंनी आत्महत्या केल्याचे फक्त त्यामध्ये सांगण्यात आलंय.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                