माजी विरोधी पक्षनेते दानवे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ…
नाशिक: मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असलेल्या एका माजी नगरसेवकाने भाजपाच्याच एका विद्यमान आमदाराच्या हत्येची सुपारी दिल्याचे सांगून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याने नाशिकची राज्यभर बदनामी झाली असतानाच आता राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी थेट हत्येपर्यंत नेत्यांची मजल गेल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन महिन्यात भाजपाच्या दोन माजी नगरसेवकांना पोलिसांनी गोळीबार प्रकरणात जेलमध्ये टाकले आहे. आता हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय माजी नगरसेवक कोण आणि त्याने कोणत्या विद्यमान आमदाराच्या हत्येची सुपारी दिली? याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राजकारणातील महत्त्वाकांक्षेपोटी असे प्रकार घडू लागले तर कायदा सुव्यवस्थेचे काय होणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
कॉल डिटेल्स मुख्यमंत्री फडणवीसांकडे?
यासंदर्भातील संबंधित माजी नगरसेवकाचे कॉल डिटेल्स आणि इतर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे गेल्यानंतर त्यानी यासंदर्भात कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिल्याचेही सांगितले जात आहे. मुळात हा माजी नगरसेवक कोण? आणि त्याने कोणत्या विद्यमान आमदाराच्या हत्येची सुपारी कशासाठी दिली? हा कळीचा मुद्दा आहे, गेल्या अडीच वषांत राज्यातील राजकारण अलात खालच्या घराला गेल्याचा अनुभव सर्वसामान्य नागरिक घेत आहेत. आता राजकीय महत्वाकांक्षेतून असे प्रकार समोर येऊ लागले तर यापुढे सर्वसामान्य नागरिक आणि तरुण वर्ग राजकारणात येईनासा होईल, असे मत सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
‘तो’ माजी नगरसेवक अन् आमदार कोण?
गेल्या वर्षभरापासून शहरातील गुन्हेगारीने नाशिकचे नाव राज्यभरात गाजले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात डागाळल्यानंतर पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत शहरातील पांढरपेशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यात भाजपाच्या माजी नगरसेवकांसह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही पोलिसांनी अटक करून गजाआड केले. पोलिसांनी ही कारवाई सुरू केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने या कारवाईचे उघडपणे स्वागत केले नाही, मात्र असे असतानाच सताधारी मंत्री गिरीष महाजन याच्या निकटवतीय असलेल्या भाजपाच्याच एका माजी नगरसेवकाने विद्यमान आमदाराच्या हत्येची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट करून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे. महापालिकेत निवडून आलेल्या माजी नगरसेवकांपैकी अनेकांवर राजकीय तसेच इतर गुन्हे आधीच दाखल झालेले आहेत. दोन माजी नगरसेवक गोळीबाराप्रकरणी जेलबी हवा खात आहेत. आता शहरातील नेमक्या कोणत्या आमदाराच्या हत्येची सुपारी माजी नगरसेवकाने दिली? याबाबत शहरासह राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
महत्त्वकांक्षेपोटी टोकाचे पाऊल?
कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्यानंतर याची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. पोलीस दलाची बदनामी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून अनेक राजकीय नेत्यांना ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला महणायला भाग पाडले, मात्र आता शिस्तप्रिय आणि एकनिष्ठ कार्यकत्यांचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाल्याच एका माजी नगरसेवकाने भाजपाच्याच आमदाराच्या हत्येची सुपारी दिल्याची बातमी बाहेर आली आहे. महत्वाकांक्षेपोटी नेत्यांच्या हत्येचे प्रकार राज्यात यापूर्वी कधीही घडल्याचे ऐकिवात नाही, मग याची सुरूवात नाशिकमधून आणि तेही शिस्तप्रिय भाजाधमधूनच होगार होती की काय? अशी चचर्चाही आता सुरु झाली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला बदनाम करण्याचे हे धड्यंत्र आहे. माजी विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यानी केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यांच्याकडे यासंदर्भातील काही पुराणे असतील तर त्यांनी पोलीस यंत्रणेकडे सोपवावे, अशी प्रतिक्रिया भाजपा महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.


